पृथ्वीराज चव्हाण हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती.
१९९१ मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले आणि २००२ मध्ये ते राज्यसभा सदस्य झाले.२००४ ते २००९आणि २८ मे २००९ आणि त्यानंतर पीएमओमध्ये राज्यमंत्री होते.
पृथ्वीराज चव्हाण ११ नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.तसचं त्याआधी ते दिल्लीत सोनिया गांधी यांच्यासमवेत काँग्रेस कार्यालयात कार्यरत होते. लोकशाही पद्धतीने अध्यक्ष निवडला गेला पाहिजे अशीही भूमिका त्यांनी मांडली होती.