बाळासाहेब थोरात यांचं संपूर्ण नाव बाळासाहेब ऊर्फ विजय भाऊसाहेब थोरात असं आहे. अत्यंत मितभाषी आणि मनमिळावू स्वभावाचे नेते म्हणून ते सर्वपरिचित आहेत. विकासकामे करणारा द्रष्टा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते प्रतिनिधीत्व करत असलेल्या संगमनेरला ‘शैक्षणिक नगरी’ म्हणून ओळखलं जातं.
गेली ४० वर्षे बाळासाहेब थोरात संसदीय राजकारणात आहे. १९८५ ते २०१९ पर्यंत ते संगमनेरचं नेतृत्व केलं. १९८५ मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढले होते. या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर १९७८ मध्ये भाऊसाहेब थोरात आमदार झाले. एकाही निवडणुकीत त्यांचा कधी पराभव झालेला नाही. ते आठव्यांदा संगमनेरचे आमदार झाले. २०१९ काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेतेपदी,काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी, काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाली.