विजय नामदेवराव वडेट्टीवार , विरोधी पक्षनेते, काँग्रेस

विजय नामदेवराव वडेट्टीवार हे चंद्रपूरच्या गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावचे. वडेट्टीवार यांच्या राजकारणाला विद्यार्थी चळवळीपासून झाली. १९८०ते १९८१ पर्यंत ते एनएसयूआयमध्ये सक्रिय होते. एनएसयूआयमध्ये सक्रिय असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

१९९१ ते ९३ दरम्यान वडेट्टीवार गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य होते. १९९६ -९८ मध्ये युतीचे सरकार असताना ते वनविकास महामंडळाचे चेअरमन होते. १९९८ ते २००४ या दरम्यान ते विधानपरिषदेवर निवडून गेले. २००४ मध्ये ते चंद्रपुरातील चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.

२००८ -०९ मध्ये त्यांनी जलसंपदा राज्यमंत्रिपद भूषवलं होतं. शिवाय ते आदिवासी विकास, पर्यावरण आणि वन राज्यमंत्रीही होते २०१४ मध्ये त्यांनी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून बहुमताने विजय मिळवला. त्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
२०२३ मध्ये विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे.